षटचक्र म्हणजे काय ? What is Shatchakra?

कुंडलिनी ही मानवी शरीरात असलेली एक दिव्य शक्ती आहे. कुंडलिनी जागृतीच्या संदर्भात षटचक्रांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कुंडलिनी विज्ञान व प्रचलित शरीरशास्राचे ज्ञान यांना जोडणारा हा दुवाच आहे. कारण या षटचक्रांना मानवी शरीरात प्रत्यक्ष अस्तित्व आहे. या प्रत्येक चक्राच्या ठिकाणी मज्जातंतूचे जाळे आढळून येते.

षटचक्रे सहा आहेत. ही चक्रे व त्यांची स्थाने आपल्या शरीरातील मज्जारज्जूंच्या मज्जातंतूशी संबंधित आहेत. त्यांचा क्रम खालून वर सांगितलेला आहे. या चक्रांना कमळाच्या फुलांची उपमा दिली गेली आहे.

Shatchakra image,

१)मुलाधार चक्र : या चक्राचे स्थान पुरुषांमध्ये गुद्द्वार व जननेंद्रिय यांच्या मध्यावर साधारणत: शिवणीच्या अर्धा इंच वर असे आहे व स्त्रियांमध्ये ते गर्भाशय मुखापाशी आहे. व पृथ्वी यांचे केंद्र स्थान आहे.याला चार पाकळ्या असून, त्याचा रंग लालभडक आहे. याची देवता गणपती आहे.

२)स्वाधिष्ठान चक्र : यालाच लिंगचक्र असेही म्हणतात.हे चक्र पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाला लागून त्याच्या खालच्या दिशेने आहे. व यात आप तत्त्व आहे.याला सहा पाकळ्या असून, त्याचा रंग शेंदरी आहे. या चक्राची देवता ब्रह्मा आहे. या चक्राद्वारे मोठ्या आतड्याचे व मलाशयाचे नियंत्रण केले जाते.

३)मणिपूर चक्र : यालाच नाभी चक्र असेही म्हनतात. हे चक्र नाभीच्या रेषेत मागच्या बाजूला पाठीच्या कण्याच्या आत परंतु मज्जारज्जूच्या बाहेर आहे. व यात अग्नि तत्व आहे.याला दहा पाकळ्या असून, त्याचा रंग पिवळा आहे. या चक्राची देवता विष्णू आहे. या चक्राद्वारे पचनेंद्रिय, मुत्रपिंडे, टेस्टिज, ओव्हरिज या अवयवांचे नियंत्रण केले जाते.

४)अनाहत चक्र : हे चक्र हृदयाच्या मागच्या बाजूला पाठीच्या कण्याच्या आत व मज्जारज्जूच्या बाहेर आहे. यात वायू तत्व आहे.याला बारा पाकळ्या असून, त्याचा रंग निळा आहे. या चक्राची देवता शंकर आहे. या चक्राद्वारे हृदय व फुफ्फुस नियंत्रण केले जाते.

५)विशुद्धी चक्र : हे चक्र मानेच्या मणक्यांच्या मध्यभागी असून, ते पाठीच्या कण्याच्या आत व मज्जारज्जूच्या बाहेर आहे. यात आकाश तत्व आहे.याला सोळा पाकळ्या असून, रंग जांभळा आहे. या चक्राची देवता जीवात्मा आहे. या चक्राद्वारे स्वरयंत्र व थायरॉइड, हृदय व फुफ्फुसाचे नियंत्रण केले जाते.

६)आज्ञाचक्र : हे चक्र भूमध्याच्या रेषेत व टाळूच्या खाली आहे. हे ठिकाण साधारणत: पिनीयल ग्लँडच्या ठिकाणाशीच येते. याला फक्त दोनच पाकळ्या आहेत. या चक्राची देवता आत्मा आहे. या चक्राद्वारे डोळ्यांचे नियंत्रण केले जाते.

७)सहस्त्रार चक्र : हे षटचक्रांच्या मालिकेतील सर्वात वरचे व अंतिम चक्र आहे. वरील सर्व सहा चक्रे सहस्त्रार चक्रालाच जोडलेली आहेत. या चक्राला हजारो पाकळ्या असून, त्या विविध रंगाच्या आहेत. संपूर्ण शरीराचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूशी याचे साधर्म्य आहे. या चक्राला सर्व नियंत्रक असे म्हटले असून, मानवाच्या अध्यात्मिक विकासाचे केंद्रही म्हटले आहे.

Shatchakra images
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *