वेदवांड्मय काय आहे ? What Is Vedic Literature?

वेद हे जगातील प्राचीन वाङ् मयापैकी एक आहे. वेदांचा निश्चित काल सांगता येत नाही त्याबाबतीत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. परंतु सर्व भारतीय कल्पना आणि विचारांचा उगम वेदात आहे असे मानले जाते. वेदकाळात ऋषींना जाणवलेले ज्ञान हे वेदांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहेत. वेदांचे जतन है मौखिक परंपरेमुळे झाले.

https://www.instagram.com/p/Czd0WNOsO5e/?igshid=a3EyeGtuM2FpdHIy

वेद हा शब्द संस्कृत मधील विद या धातूपासून तयार झालेला आहे. विद चा अर्थ ज्ञान होणे, जाणणे असा आहे. संस्कृतात वेद हे उपपद वापरून विविध ज्ञानशाखांचे वर्णन करण्यात आले आहे. उदा. आयुर्वेद, धनुर्वेद इत्यादि.

वैदिक वाङ्मय हे जरी प्राचीन असले तरी सर्वच वेद एकाच काळात रचले गेले असे नाही. वेदांचा कर्तादेखील एकच ऋषी किंवा एकच व्यक्ती नसून अनेक ऋषींनी वेदातील ऋचा रचल्या आहेत. वेदांची मौखिक परंपरा अजूनही जिवंत आहे. हजारोवर्षापूर्वी वेद सुक्तांचे उच्चारण ज्या पद्धतीने केले जात होते त्याच पद्धतीने आजही केले जाते. काही जणांच्या मते, वैदिक वाङ् मय हे अपौरुषेय आहे. म्हणजे वेद हे कोणा मानवी व्यक्तिंनी रचलेले नाही. तर ते वैदीक शब्द आहेत व ते ऋषीना ऐकायला मिळाले होते. म्हणून त्यांना ‘श्रुति’ म्हणतात. यामुळे त्यांना अपौरुषेय मानले जाते. वेद हे अविनाशी मानले जातात. वेदांच्या प्रामाण्याविषयी शंका घेतली जात नाही. वेदांचे प्रामाण्य मान्य करणाऱ्या भारतीय दर्शनांना आस्तिक दर्शने मानले जाते व तसे न मानणाऱ्यांना नास्तिक दर्शने म्हटले जाते.

वेद चार आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे

१) ऋग्वेद

२) यजुर्वेद

३) सामवेद

४) अथर्ववेद

प्रत्येक वेदांचे पुढील भाग पडतात.

१) संहिता

२) ब्राम्हणे

३) आरण्यके

४) उपनिषदे

संहितेत मुख्यतः देवतांची स्तूती कवने आढळतात. यात विविध निसर्गशक्तीची आराधना केलेली आढळते. ब्राम्हण ग्रंथात प्रामुख्याने यज्ञविधींचे वर्णन आढळते. यज्ञ कशापद्धतीने करावेत ते कशासाठी आहेत याविषयीची सविस्तर माहिती त्यात आढळते. आरण्यकेमध्ये यज्ञ विधीमार्गाची तात्त्विक भूमिका आढळते, तर उपनिषदांमध्ये प्रामुख्याने तत्त्वविचार आढळतो. उपनिषदे ही वेदांचा शेवटचा भाग आहे. म्हणून त्यांना वेदांत असे देखील म्हटले जाते.

सिंधू संस्कृती ही ऋग्वेदापूर्वी बरेच वर्षे अस्तित्वात होती ही गोष्ट आता पुराव्यानिशी वस्तू, भाषा, शब्द, प्रतिके यांच्या मार्फत ठामपणे मांडण्यात येत असून स्वीकारण्यात येत आहेत.” ऋग्वेदातील संहितेत देवतांना प्रार्थना केलेली आढळते. अग्नि, इंद्र, वरूण, मरुत, अश्विन, सोम, मित्र, उपा इत्यादी अनेक देवतांची स्तूती त्यात आढळते. ह्या स्तुतीपर कवनांना ‘सुक्ते’ अथवा ‘मंत्र’ म्हणतात. देवतांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे आणि त्यांच्या कृपाप्रसादाने आपणांस हव्या त्या गोष्टी मिळवून घ्याव्यात अशी यज्ञकर्त्यांची भूमिका असते. देवाकडे गाई, घोडे, धान्य, संपत्ती, संतती यांची मागणी केली जात होती. ऋग्वेदामध्ये देवतेपुढे नम्रपणाची भूमिका घेतलेली आढळते. तर अथर्ववेदाच्या काळात ह्या भूमिकेत बदल झालेला आढळतो. अथर्ववेदाचा भर यातुविद्या म्हणजेच जादूटोणा ह्यावर आहे. अथर्ववेदानुसार मंत्रात प्रचंड सामर्थ्य आहे, त्याच्यानुसार मंत्राद्वारे आणि यज्ञविधीच्या योग्य प्रक्रियाद्वारे आपणाला हव्या त्या गोष्टी करणे देवतांना भाग पडेल.

WHAT IS VEDIC SCIENCE & LITERATURE ?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *