मासिक पाळी म्हणजे काय ? What is menstrual cycle?

मासिक पाळी हा खुप महत्वाचा विषय आहे. आपल्या समाजाने याला खूप नाजूक विषय बनवल आहे. नैसर्गिकरीत्या प्रत्येक स्त्रीला एका वयामध्ये मासिक पाळी येतच असते आणि यामुळेच प्रजनन होत असते. परंतु समाजामध्ये या गोष्टीला एका विचित्र रूप देऊन याबद्दल फारसं बोललं जात नाही .तर ही गोष्ट वेगळी काही नसून आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. याबद्दल उघडपणे बोलले जात नसल्यामुळे नक्की मासिक पाळी काय असते ,याबद्दल पुरुषांना तर माहिती नसतेच तर मुलींनाही ज्यांना नवीन मासिक पाळी सुरू झाली आहे अशा मुलींनाही याबद्दलची पुरेशी माहिती नसते. व त्यामुळेच पुढे जाऊन खूप काही समस्या उद्भवतात .

मासिक पाळी म्हणजे नेमकं काय?

दर महिन्याला स्त्रीच्या योनीमधून 3 ते 7 दिवस थोडे थोडे रक्त बाहेर पडत असते पहिल्या दिवशी सर्वात जास्त रक्त बाहेर पडते आणि नंतरच्या दिवसात हा ओघ कमी होत जातो साधारणपणे मुली दहा ते पंधरा वर्षाच्या झाल्या की त्यांची मासिक पाळी सुरू होते.

मासिक पाळी का येते?

ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे त्यामुळेच आज आपले अस्तित्व आहे भविष्यात मुलांना जन्म द्यायचा असेल तर त्याची तयारी आतापासून करावी लागते त्याचाच परिणाम म्हणून वयाच्या बाराव्या वर्षापासूनच मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते. शरीरात बाळ गर्भाशयात बनते, गर्भाशय पोटाच्या खालच्या भागात असते आपली वाढ होत असताना एका ठराविक वयानंतर आपलं गर्भाशय भविष्यात होणाऱ्या बाळासाठी तयारी करत असते प्रत्येक महिन्यात गर्भाशयाच्या आतल्या पृष्ठभागावर रक्त आणि मूळ पेशींनी बनलेला नवा थर निर्माण होत असतो हा थर बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असतो पण तुम्ही जोपर्यंत गर्भवती होत नाही तोपर्यंत तुमच्या गर्भाशयाला रक्त आणि मऊ पेशींनी बनलेल्या या थराची गरज नसते. म्हणून दर महिन्याला रक्तस्त्रावाच्या रूपात हा थर योनी बाहेर पडतो त्याला आपण मासिक पाळी म्हणतो.

मासिक पाळी येण्याची लक्षणे –

कोणत्याही मुलीसाठी तारुण्य ही अशी वेळ असते जेव्हा तिचे शरीर अंडाशयातून तयार होणाऱ्या हार्मोन्समुळे बदलत असते. हे सहसा 8 ते 13 वयोगटात सुरू होते आणि स्तनांचा विकास, अंडरआर्म्स तसेच जघन भागात केसांची वाढ, शरीरात दुर्गंधी आणि हार्मोन्सच्या प्रभावामुळे व्हर्जिन क्षेत्रातून काही स्त्राव होऊ शकतो. ही चिन्हे सूचित करतात की तुमची पहिली मासिक पाळी येणार आहे. या व्यतिरिक्त पोटात, कंबरेत वेदना, पोट फुगणे, पिंपल्स येणे याची लक्षणे असू शकतात. साधारणपणे मुलीच्या मासिक पाळीचा काळ स्तनाच्या वाढीच्या दोन ते तीन वर्षांनी सुरू होतो. जास्त वजन असलेल्या मुलींमध्ये हे आधी सुरु होतो आणि नंतर कमी वजन असलेल्या किंवा खेळ, नृत्य, जिम्नॅस्टिक किंवा ट्रॅकिंग यासारख्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या मुलींमध्ये याची सुरुवात होऊ शकते.

मासिक पाळी किती दिवसांनी येते?

महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. सामान्य मासिक पाळी 28 दिवसांची असते. याचा अर्थ कालावधीच्या पहिल्या दिवसापासून पुढील कालावधीच्या पहिल्या दिवसापर्यंत अंदाजे 28 दिवस. 28 दिवस ही सरासरी संख्या आहे, परंतु ती 21 ते 35 दिवसांच्या दरम्यान असणे देखील सामान्य आहे. मुलीला एक किंवा दोन वर्षे अनियमित मासिक पाळी येणे सामान्य आहे. तुम्ही तुमच्या वार्षिक तपासणीसाठी जाता तेव्हा तुम्ही तुमचे पीरियड कॅलेंडर डॉक्टरांशी शेअर केले पाहिजे. तुमच्या मासिक पाळीच्या दुसर्‍या वर्षी 6 पेक्षा कमी पाळी येत असल्यास किंवा त्यानंतर वर्षातून 8 वेळा कमी असल्यास, ते तणाव, जास्त व्यायाम, वजन कमी करणे किंवा आहारामुळे असू शकते. जर तुमच्या मासिक पाळीत 35 दिवसांपेक्षा जास्त अंतर असेल तर तुम्ही चाचणी करून घ्यावी.

या विषयावर उघडपणे जास्त काही बोललं जात नसल्यामुळे नवीन मुलींना तसेच जुन्या स्त्रियांना पुरुषांनाही याबद्दल काहीही माहिती नसते त्यामुळेच नंतर यूटीआय सारखी इन्फेक्शन्स तसेच मासिक पाळी मध्ये होणारे प्रॉब्लेम्स अशा गोष्टींना समोर जावं लागतं पुढच्या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया मासिक पाळी विषयीच्या मुलींच्या समस्या .

What is menstrual cycle?

The menstrual cycle is a regular process that occurs in the female reproductive system, typically lasting around 28 days, although it can vary for different individuals. It involves the monthly release of an egg from the ovaries (ovulation) and the preparation of the uterus for a potential pregnancy. If the egg isn’t fertilized by sperm, the uterine lining is shed, resulting in menstruation, commonly known as a period.

The cycle is regulated by hormones such as estrogen and progesterone. It comes as a natural part of a woman’s reproductive system and is essential for the possibility of pregnancy.The menstrual period, also known as menstruation, occurs as a result of the shedding of the uterine lining. This lining, known as the endometrium, thickens each month in preparation for a possible pregnancy. If pregnancy does not occur, the body no longer needs the thickened lining, so it is no longer maintained.As a result, the levels of hormones like estrogen and progesterone drop, causing the blood vessels in the uterine lining to constrict and the tissue to break down. This breakdown leads to the release of blood, mucus, and tissue fragments from the uterus, which exit the body through the cervix and the vagina. This process usually lasts around 3 to 7 days.

The menstrual period is a natural part of the female reproductive cycle, occurring approximately every 28 days for many individuals, although this can vary. It marks the beginning of a new menstrual cycle, during which the body will again prepare the uterine lining for a potential pregnancy.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *