पंचमहाभूत काय आहेत ?

यत पिंडे तत ब्रह्मांडे।

या उक्तीप्रमाणे जे संपूर्ण ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरातही आहे आपले व इतर सर्व प्राण्यांचे शरीर तसेच सर्व वस्तू पाच गोष्टींपासून बनल्या आहेत आणि आपले ब्रह्मांड ही त्याच पाच गोष्टींपासून बनलेले आहे .

आपण निरीक्षण केलं तर आपल्याही लक्षात येईल की आपल्या शरीरात ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला निसर्गातही आहेत .

१)पृथ्वी – आपल्या शरीरातील कठीण भाग, उदा- हाडे

२)आप – स्वेद ग्रंथी, मूत्रल भाग, रक्त परिवहन

३)तेज – शरीरातील पाचन संस्था

४)वायु – श्वसन संस्था

४)आकाश – शरीरामध्ये असणाऱ्या पोकळ्या

पंचमहाभुत म्हणजे काय ? What is panchmahabhut ?

हे शरीर ,पृथ्वी आणि ब्रह्मांड सर्वकाही याच पंचमहाभूतांपासून बनलेले आहे याच तत्त्वांच्या कमी अधिक प्रमाणात एकत्र येऊन सर्व गोष्टींची निर्मिती झालेली आहे.

१)पृथ्वी – ज्या जमिनीवरून आपण चालतो तिची स्वतःची बुद्धी व स्मरणशक्ती असते. म्हणून आपण जरी काँक्रीटच्या जंगलात राहत असलो तरी ज्या धरतीवर आपण जगतो तिच्या संपर्कात असणं अतिशय आवश्यक आहे कुठल्या न कुठल्या मार्गाने ज्या ठिकाणी राहता येईल जमिनीच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा. अनवाणी चालणे विशेष करून तळहात आणि तळपाय रोज काही काळासाठी मातीच्या संपर्कात आला तर शरीरात विशेष समतोल राहतो कारण हाच आपला पाया आहे अप्रत्यक्षपणे धरतीच आपली माता आहे.

२)आप – पाण्यामध्ये लक्षात ठेवण्याचा गुण सर्वात जास्त आहे पाण्याच्या साठ्याच्या भोवतीचे घडतं त्याची स्मृती पाणी ठेवते त्यालाच फ्लूड कम्प्युटर असे म्हणतात. जलतत्त्व अतिशय महत्त्वाचा आहे कारण शरीराचा 72 टक्के भाग पाणी आहे त्यामुळे आपण जे पाणी पितो त्याबद्दल आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यात घाण विषाणू नाहीत ना एवढेच नाही ते पाणी आपण कसे साठवतो कोणत्या प्रकारच्या भांड्यात साठवले कसे ठेवले त्याला तुम्ही स्पर्श कसा करता कारण एखादा विचार, भावना, स्पर्श पाण्याची शरीरातील कारमुक्ता बदलत असतो पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवून त्याला सेंद्रिय पदार्थने स्वच्छ करावे व त्याला अशा ठिकाणी ठेवावे जिथे त्याला कशाचाच वासाचा ही स्पर्श होणार नाही तर ते योग्य काम करते व त्याच्या सेवनाने शरीरात बदल जाणवतात.

३)वायु – वायु शरीराचा फक्त ६ टक्के भाग व्यापत असला तरी हा प्रत्यक्ष रित्या होणारा देवाणघेवाणीचा विषय आहे .आतून आणि बाहेरून सतत हवेची देवाणघेवाण होत असते .शुद्ध हवेने शरीराची ताकद मनाची एकाग्रता वाढते खोल श्वास घेणे लाभदायक असते तर घरी बसून नाडीशुद्धी सारख्या क्रिया केल्याने प्राणाची शुद्धी होते तसेच आपण प्राणायामही करू शकतो.

४)अग्नि – महाभूतांनी बनलेल्या शरीराचा ४ टक्के भाग हा अग्नीने व्यापलेला आहे आपण अग्नीची काळजी घेतली तरच आपल्या शरीराच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतली जाईल कारण आपला राग संताप यावरच अवलंबून असतो अग्नीची काळजी घेतली तर या गोष्टी नियंत्रित राहतील व आपण संतुलित व उत्साही व्यक्ती होऊ रोज थोडा सूर्यप्रकाश मिळवावा कारण आपण सूर्यप्रकाशाला दूषित करू शकत नाही तो शुद्ध आहे त्याचा वापर केला पाहिजे. अग्नि समोर उभे राहिल्याने शरीरात अग्निसांचारतो आभा शुद्ध होतो शरीरात उर्जेचा संचार होतो .शरीरातील जठराग्नी व ७ प्रकारचे धातु अग्नि आणि पंचमहाभूतांनी असे १३ अग्नि असतात. यातील अन्नपचनासाठी उपयोगी असणारा जठर अग्नि अतिशय महत्त्वाचा आहे.

५)आकाश – पंचमहाभूतांतील शेवटचा व व्यापक तत्त्व म्हणजे आकाश. सर्व महाभूत ठरलेले आहेत पण आकाश अमर्याद आहे .आकाशाची कोणतीही सीमा आपण ठरवू शकत नाही शरीरातील पोकळी म्हणजेच आकाश महाभूत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *