त्रिदोष


आयुर्वेदाचे तीन स्थंभ म्हणजे त्रिदोष.आज आपण आयुर्वेदातील त्रिदोष वात ,पित्त, कफ ,याबद्दल जानून घेऊया.वात ,पित्त ,कफ हे त्रिदोष आयुर्वेदाचा पाया आहेत .कारण आयुर्वेदिक चिकित्सा करताना प्रथम या तीन दोषांचा विचार करावा लागतो. शरीरात कोणताही व्याधी असेल तरी चिकित्सा करताना या तीन दोषांचाच विचार केला जातो . कारण याच दोषांच्या दृष्टीमुळे सर्व प्रकारचे रोग होत असतात.
तर त्रिदोष असतात कुठे ?
शरीरात यांचं स्थान कोठे असतं?
हे वाढतात कधी, कमी कधी होतात?
यांची गुण काय आहेत ?
आणि सर्वच आजारांमध्ये यांचा विचार करणं का महत्त्वाचा आहे ?
दोष म्हणजे काय तर “दूषयन्ती ईति दोषाः।” म्हणजे जे स्वतः दूषित होतात आणि दुसऱ्यांनाही दूषित करतात त्यांना दोष असे म्हणतात.
आपल्या शरीरामध्ये वात, पित्त ,कफ हे तीन दोष असतात .हे तीनही दोष जर साम्य अवस्थेमध्ये असतील तरच आपले शरीर निरोगी राहते .आणि जर काही कारणांनी या दोषांपैकी कोणताही दोष कमी किंवा जास्त झाला तर ते दोष आपले स्वास्थ्य बिघडवतात व त्यामुळे शरीराल विविध व्याधी जखडतात .त्यामुळेच हे दोष साम्य अवस्थेमध्ये असने व आपण त्यांचे साम्यवास्ता टिकवून ठेवणं गरजेचं असतं.

त्रिदोषांची स्थाने :
हे दोष शरीरामध्ये सर्वत्र असले तरी या दोषांच्या शरीरातील विशिष्ट स्थानांचे वर्णनही संहितांमध्ये आलेले आहे.
यामध्ये आचार्य वागभट नुसार नाभीच्या खालचा भाग वाताचे मुख्य स्थान आहे .
नाभीच्या व हृदयाच्या मधला भाग पित्तदोषाचे मुख्य स्थान आहे .
हृदय व हृदयाच्या वरचा भाग कफदोषाचे मुख्य स्थान आहे .
यावरून आपल्या लक्षात येते की हे तीनही दोष संपूर्ण शरीरामध्ये जरी असले तरी काही विशिष्ट ठिकाणी दिलेले आहे त्या ठिकाणी ते अधिक प्रमाणात असतात.

कोणत्या वयात कोणत्या दोषांचे अधिक्य असते?
बाल्यावस्था तरुण अवस्था व वृद्ध अवस्था या वयाच्या तीन अवस्था आहेत . बाल्यावस्थेमध्ये कफाचे अधिक्य असते त्यामुळे बाल्यावस्थेमध्ये कफाचे व्याधी बालकांना मोठ्या प्रमाणात होतात. तसेच तारुण्यावस्था मध्ये पित्ताचे अधिक्य असते त्यामुळे तरुण्यवस्थेमध्ये पित्ताचे रोग जास्त प्रमाणात होतात व वृद्ध अवस्थेमध्ये वाताचे अधिक्य असते त्यामुळे वाताचे रोग जास्त प्रमाणात होतात.

वेळेनुसार दोषांचे आधिक्य :
यामध्ये आपण जर आपल्या दिवसाचे विविध भाग केले तर यामध्येही दोषांचे प्रमाण बदलत असते सकाळी कपाचे अधिक असते दुपारी पित्ताच्या देखील असते तर संध्याकाळी वाताचे अधिक असते आणि रात्रीचे तीन भाग केले तरी त्याच्या सुरुवातीच्या मधल्या आणि अंतिम टप्प्यात वाटपित्त कफ यांचेच अधिक असते
आयुर्वेदात योग्य तो आहार दिनचर्या पथ्य ऋतुचर या अशा विविध गोष्टींचे पालन करायला सांगितले आहे यामुळे आपले स्वास्थ्य टिकून राहत असते परंतु या गोष्टींचे पालन न झाल्यास आपल्या शरीरातील दोष हे कमी होतात किंवा वाढतात व विविध व्याधींची निर्मिती होते

ऋतुनुसार दोष
दोषांच्या चय प्रकोप प्रसर अशा अवस्थांचे वर्णन केलेले आहे या अवस्था ऋतूनुसार येत असतात.हे तिन्ही दोष निरनिराळ्या ऋतूत या तीन अवस्थांमधून जातात. आणि याच दोषांच्या प्रकोप अवस्थेमध्ये त्या त्या ऋतूत त्यांचे शोधन कर्म केले जाते

दोषांचे गुण:-

वात
” तत्र रूक्षो लघुः शीतः खरः सूक्ष्मश्चलोsनिलः “

पित्त
“पित्तं सस्नेहतीक्ष्णोष्णं लघु विस्रं सरं द्रवम।”

कफ
“स्निग्धः शीतो गुरूर्मन्दः श्लक्ष्णो मृत्स्नः स्थिरः कफः।”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *