कशी घ्याल उन्हाळ्यात केसांची काळजी :-

उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं हा एक खूप मोठा आणि अवघड असा टास्क असतो . घाम तेलकटपणा धूळ माती प्रदूषण यामुळे केस खूप जास्त प्रमाणात खराब होऊन जातात उन्हाळ्यात तर हा त्रास जास्तच होतो . म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी पाच अशा महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या केसांची उन्हाळ्यात चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकाल.

कशी घ्याल उन्हाळ्यात केसांची काळजी

1) कोरफड :- कोरफड आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त असते व उन्हाळ्यात तर तिचे अत्यंत चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे कोरफड नक्की ट्राय करा. कोरफड मध्ये विटामिन ए ,विटामिन बी कॉम्प्लेक्स, फॉलिक ऍसिड अशी पोषक तत्व असतात त्यामुळे ते आपल्या केसांना चांगल्या पद्धतीने पोषण करतात त्यामुळे उन्हाळ्यात कोरफडचा हेअर पॅक बनवा . नंतर तो अर्ध्या तास केसावर अप्लाय करा व नैसर्गिक पद्धतीने केसांना पोषक तत्व द्या व केसांची काळजी घ्या ,तर नैसर्गिक पद्धतीने हा कोरफडीपासूनचा हेअर पॅक कसा बनवायचा ते सांगतो कोरफडच्या पानांमधून कोरफडचा गर काढून घ्या आणि त्यात चार चमचे कोरफड जेलमध्ये तुम्ही एक चमचा लिंबूचा रस ऍड करून घ्या जर तुम्हाला केसांवरती लिंबू लावायचं नसेल तर फक्त कोरफडी लावू शकता हे मिश्रण केसांवर दहा मिनिटे लावावे फक्त केसांवर नाही तर ते केसांच्या मुळापर्यंत खोलवर जाईल याची काळजी घ्यावी जेणेकरून केसांना आतपर्यंत पोषण मिळेल दहा मिनिटानंतर कोमट पाण्याने केस धुऊन घ्यावेत, तुम्हाला जेव्हा जेव्हा केस धुवायचे असतील तेव्हा तेव्हा तुम्ही या पद्धतीचा वापर करून केस धुवू शकता त्यामुळे तुमचं स्काल्प थंड राहतो व तेलकटपणाही निघून जाण्यास मदत होते.

२)ग्रीन टी – ग्रीन टी सुद्धा केसांना पोषण देण्याचे काम करत असते त्यामुळे ग्रीन टी चा ही केस धुण्यासाठी वापर केला जातो नेहमीप्रमाणे केस धुवुन यामध्ये नेहमीप्रमाणे केस धुवून घ्यावे व नंतर ते ग्रीन टी च्या पाण्याने केस धुवावे ग्रीन टी मुळे केस वाढतात व त्यामध्ये असलेले सनस्क्रीनचे गुणधर्म केसांची उन्हापासून रक्षा करतात यासाठी तुम्ही ग्रीन टी चे दोन तीन पॅकेट्स घ्या ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा व ते ग्रीन टी चे पाणी आपले केस धुवून झाल्यानंतर केसांवर डायरेक्ट ओतून द्या त्यामुळे केसांचे पोषण तर होतच पण केसांमधला तेलकटपणा ही दूर होण्यास मदत होते.

3) केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल घ्या त्यामध्ये रात्रीच मेथी दाणे शिजवून किंवा भिजवून घ्या सकाळी यात मेथी दाणे व खोबरेल तेल व्यवस्थित गाळून घ्या आणि आपल्या केसांवर वीस मिनिटांपर्यंत मसाज करा खोलवर मसाज केल्याने केसांना पोषण मिळते ,केसातील तेलकटपणा दूर होऊन जातो आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा एक महिन्यांमध्ये याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होते. यामुळे उन्हाळ्यात तुम्हाला तुमच्या केसांमध्ये होणारा त्रास कमी झालेला दिसून येईल.

TIPS FOR HAIRCARE IN SUMMER

४) हेअर स्ट्रेटनर ,हेअर कर्लर, हेअर ड्रायरचा वापरही करणे टाळावे या सगळ्या प्रोडक्स मधून आपल्या केसांना हिट दिली जाते त्यामुळे उन्हाळ्यात आपले केस अधिकच खराब होत असतात. त्याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या केसांच्या संरक्षणासाठी टोपी किंवा स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे नाहीतर बाहेरच्या उन्हा मुळे कचऱ्यामुळे आपले केस खराब होतात.

५) एका वाटी मेहंदीत आवळा ,शिकेकाई ,रिठा, मेथी ,कडुनिंब, तुळशीची पाने एक एक चमचा घेऊन दह्यात मिक्स करा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घेऊन हे मिश्रण बनवून केसांना अर्ध्या तासापर्यंत लावून ठेवावे. लावताना केसांच्या मुळापर्यंत लावून ठेवावे जेणेकरून की आपले केस मजबूत होतात .केसांना चमक येते हे केसांमध्ये असलेले एक्स्ट्राच तेल नाहीस होतं. केसातला चिकटपणाही नाहीसा होतो. केस सुटसुटीत होतात तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करू शकता.

या उन्हाळ्यात आपल्या नाजूक केसांना स्वच्छ ठेवायचं असेल व केसांचे निरोगी आरोग्य जपायचा असेल तर तर त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही दिलेल्या टिप्स फॉलो करा व आपल्या केसांना नैसर्गिक पद्धतीने निरोगी बनवा.

मार्केटमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू केमिकल युक्त पदार्थ आणि कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करणं जेवढं शक्य होईल तेवढे टाळावं कारण यामुळे रिझल्ट भेटतो व आपण खुश होऊन जातो परंतु याची आपल्या केसांवर खूप गंभीर परिणाम होत असतात. केस पांढरे होणे, केस गळणं ,टक्कल पडणं अशा अनेक समस्यांना नंतर आपल्याला तोंड द्यावे लागत व नंतर हे असे प्रॉडक्ट वापरून आपले केस परत माघारी येत नाही त्यामुळे जेवढे केस आहेत तेवढेच नैसर्गिक पद्धतीने जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. वरील सर्व टिप्स या घरगुती आहे त्यामुळे त्या वापरण्यासाठी अतिशय सोप्या कमी खर्चाची व आपला वेळ वाचवणारे आहेत व अतिशय फायद्याच्या आहेत त्यामुळे त्यांचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच फायदा होणार आहे त्यामुळे त्यांचा नेहमी वापर करावा.

टीप – काहीजणांना काही गोष्टींची ॲलर्जी असू शकते त्यांच्या त्वचेवर काही गोष्टींचा वापर केल्यामुळे एलर्जी निर्माण होऊ शकते त्यामुळे वर दिलेल्या गोष्टींचा आपल्या त्वचेवर काही एलर्जी तर नाहीये ना किंवा त्यांचा त्रास होत नाही हे समजून घेऊन त्यांचा वापर करावा व कोणत्याही प्रकारचे बाहेरचे प्रोडक्ट्स वापरताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *