कडुनिंबाचे फायदे

आपण कडुनिंबाचा लहानपणापासून काही ठिकाणी झालेला वापर पाहत आलेलो आहे. कडुनिंबाची पाने धान्य साठवल्यावर त्यावर ठेवल्याने त्यात कृमी होत नाहीत .तसेच गुढीपाडव्यासारख्या सणाला कडुनिंबाचा मोहर खायला दिला जातो. कडुलिंबाच्या निंबोळ्यांचा खत शेतात टाकला जातो तो कीटकनाशकाचे काम करतो अशा अनेक प्रकारचे फायदे कडुनिंबाचे आपल्याला लहानपणापासून माहिती आहेत पण आयुर्वेदामध्ये याची भरपूर सारे आरोग्याच्या बाबतीत होणारे फायदे दिलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत व आपल्याला माहिती पाहिजेत.

दररोज जीवन जगताना हे कडुनिंबाचे उपयोग आपल्याला कामी येतील. कडुलिंबाला संस्कृत मध्ये अरिष्ठ असे म्हणतात . अरिष्ठ म्हणजे कधीही नष्ट न होणारे कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जाते आणि त्याचे अनेक आयुर्वेदिक व गुणकारी फायदे आहेत. पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधात वापर केला जातो. कडुलिंबाची फक्त पानेच नव्हे तर बिया ,मुळे ,साल यांच्यामध्येही महत्त्वाची संयुगे असतात त्यामुळे संपूर्ण झाड गुणकारी असल्याचे आढळून येते .कडूनिंबात 130 विविध प्रकारची जैव संयुगे असतात जी शरीराला व्याधीमुक्त करण्यास मदत करतात तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठबळ देतात. यात आपल्या आरोग्याच्या प्रत्येक बाजूत सुधारणा घडवून आणण्यारया जीवनसत्वाचा व फॅटी ऍसिड चा समावेश असतो.

याचे फायदे खालील प्रमाणे:-

१)कर्करोगात प्रतिकार- कडुनिंबात कर्क पेशी नष्ट करण्याची शक्ती असते प्रत्येकाच्या शरीरात कर्कपेशी असतात परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही मात्र काही काळ विशिष्ट परिस्थितीत पेशींची संदेश ग्रहण संस्था क्षितिग्रस्त होते त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते परंतु रोज नियमितपणे कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्यास कर्क पेशींची संख्या प्रमाणात राहते.

२)हाडांसाठी उपयुक्त- कडुनिंबांच्या पानात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि खनिज यांची मात्रा असते त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्त आहे तसेच सांधेदुखी ,गुडघेदुखी होत असल्यास कडूनिंबाच्या तेलाने नियमित मालिश करावी त्यामुळे स्नायू मधील वेदना सांध्यातील वेदना व पाठीचे दुखणे बंद होते.

३)अँटी व्हायरल क्षमता- कडुनिंब विषाणू प्रतिबंधक म्हणूनही काम करतो कडूनिंब हे एचआयव्ही, पोलिओ ,कॉक्सिक बॅक्टेरिया ग्रुप, डेंगू इत्यादी विषाणूंना त्यांच्या निर्माण होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात रोखतो. कडूनिंब हे विषाणू संसर्गाच्या दरम्यान शरीराकडून मिळणारा प्रतिसाद तीव्र बनवते. कडुनिंबात अँटिव्हायरस क्षमता असून त्यात विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत .कडुलिंब शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रोगप्रतिकारक यंत्रणेला वेग देते यातील टी सेल्स मायक्रो आणि विषाणूंमध्ये विषद्रव्य संक्रमित करून त्यांचा नाश करते.

४)एंटीफंगल- कडुनिंबाचे तेल हे आपलीच फुट रिंगटोन फंगल इन्फेक्शन अशा बुरशीजन्य संसर्गाला नाहीसे करते. कडुनिंबात निंबिडिल गिलूनीन ही बुरशीनाशक द्रव्य असतात कडुलिंबाच्या तेलात आवश्यक फॅटी ऍसिड असतात ही आमले सुद्धा जखम बरी करण्यास व त्वचा निरोगी करण्यास उपयुक्त ठरतात कडुलिंब कोणतेही कुरूप वर्ण मागे न ठेवता त्वचा निरोगी करण्यास उपयुक्त ठरते .

त्वचेवर कडुनिंबाचे तेल लावल्यास त्यातील फॅटी ऍसिड व जीवनसत्वे त्वचेला आद्रता देतात व त्वचेला पोषण देतात त्यामुळे त्वचा पोषक होते व त्वचा नितळ तरुण दिसते कडुलिंबातील ई विटामिन शतग्रस्त त्वचेला दुरुस्त करते तसेच पर्यावरणीय बदलांमुळे त्वचेला होणारी हानी नियंत्रणात ठेवते पचनशक्ती मध्ये सुधारणा वजन घटविण्यासाठी मदत करते. कडुनिंबाची फुले ही अनारक्झिया मळमळणे ढेकर येणे पोटातील कृमींमुळे उपचारार्थ उपयुक्त मानली जातात पाने पचनासाठी व चयापचयासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या सेवनाने शरीर द्रव्य चांगल्या प्रकारे स्त्रावतात कडुनिंब ही कडू रसाची असल्याने लाळी व इतर शरीर श्रावणच्या पाजण्यास मदत होते. आणि चवीच्या संवेदना सक्रिय होतात .दातांच्या पोकळ्या भरून चवीची सुविधा सुधारता येते नैसर्गिक पद्धतीने वजन घटवण्यासाठी सुरक्षित मार्ग कडुनिंबाची ताजी फुले . कडुनिंबाची फुले आणि मध सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर मानले जाते. म्हणूनच सकाळी सर्वप्रथम या मिश्रणाचे सेवन करावे याला वन ट्री फार्मसी असे म्हणतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *