उन्हाळ्यात सेवन करावे असे दहा पदार्थ :-

तर आता आपण बघतोय की एप्रिल महिना चालू झालाय आणि बाहेर कडक ऊन पडत आहे, व शरीरही घामाघुम होत आहे तेव्हा यासाठीच या उन्हापासून शरीराच्या संरक्षणासाठी उन्हाळ्यात घ्याव्यात अशा काही गोष्टी आज आपण सांगणार आहोत,

उष्णता जास्त असल्याने आपण थंड पदार्थांचा वापर आपल्या आहारात करत असतो तर अशा थंड पदार्थांचा आहारात वापर करणे उन्हाळ्यात तरी गरजेचे आहे. कारण उन्हामुळे होणारा त्रास यामुळे कमी होऊ शकतो. आहारात थंड अशा द्रव पदार्थांचा वापर करावा .पाणी व पाण्यासारखे द्रव पदार्थ, रस यांचा आहारात भरपूर सेवन करावे. जेणेकरून शरीर डिहायड्रेट होणार नाही कारण उन्हाळ्यात शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जात असते त्यामुळे शरीरात डिहाइड्रेशन होत असते ते टाळण्यासाठी व त्वचा हायड्रेट राहण्यासाठी जास्त प्रमाणात पाण्याची व द्रव पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते जास्त प्रमाणात द्रव पदार्थ किंवा पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवता येते .नाही तर आपल्याला हिट स्ट्रेस जाणवु शकतो. असे दहा अन्नपदार्थ जे उन्हाळ्यात आपण आहारात घेतलेच पाहिजेत:-

उन्हाळ्यात सेवन करावे असे पदार्थ

1) दूध :- यामध्ये गाईचे दूध कधीही चांगले गाईचे दूध हे शीत गुणाचे असते त्यामुळे असं काही नाही की ते थंड करून घ्यावे किंवा कोमट करून प्यावे हे दूध आपण रूम टेम्परेचरला ही पिऊ शकतो. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात तसेच आयोडीन विटामिन डी असल्यामुळे तसेच ते शीत गुणाचे असल्यामुळे आपण त्याचे नियमित सेवन करू शकतो. दूध सकाळी , रात्री किंवा वर्कआउट झाल्यानंतरही आपण घेऊ शकतो यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो.

२) ताक( बटर मिल्क )- आपण नेहमी मार्केटमध्ये मिळत असलेले ताक वापरतो परंतु या ताकामध्ये फ्लेवर्स आणि शुगर, साल्ट अशा प्रकारे मिक्स केलेले असतात जे आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतात .त्यामुळे ताकाचा वापर करताना नेहमी घरी बनवलेल्या दह्यापासूनच ताक बनवावे ते शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरते. ताक बनवताना आपण१ वाटी दही व ४ वाटी पाणी अशा प्रमाणात ताक बनवून घ्यावी ताकाच्या शीत गुना मुळे आपल्याला त्याचे लाभ मिळतात दुपारी जेवणाच्या नंतर आपण ताक घेऊ शकतो. नियमित ताक किंवा मठ्ठा पिल्याने शरीरामध्ये थंडावा टिकून राहतो व शरीर उष्माघातापासून वाचू शकते.

३) सब्जा सीड्स :- यांच्यात नॅचरल कूलिंग इफेक्ट असतो यामध्ये फायबर चांगले असतात त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते तसेच जळजळ कमी होते बॉडी टॉक्सिफायन चे काम सब्जा सीड्स करत असतात त्यामुळे आपण आपल्या रेगुलर पाण्याच्या बॉटलमध्ये सब्जा सीड टाकून ते पाणी आपण पिऊ शकतो त्यामुळे आपले शरीर डिटॉक्सिफा होऊन शीतता निर्माण होते .

.४) सत्तू पीठ :– अलीकडे सत्तू चे पीठ हेल्दी फूड म्हणून प्रसिद्ध झाले आहे व सगळीकडे उपलब्ध आहे .आपण उष्णता जाणवत असेल तर सत्तूचे ड्रिंक बनवू शकतो यामध्ये चना डाळीचे पीठ व काही प्रमाणात गव्हाचे पीठ घातले तरी चालते तर सत्तूचे पीठ + गुळ + पाणी यांचे मिश्रण बनवून ते पेय आपण उन्हाळ्यात घेऊ शकतो यामध्ये शरीरामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा कुलिंग इफेक्ट तयार होतो व शरीर थंड होण्यास मदत होते

.५) कोकम :- कोकम सरबत आपण उन्हाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी वापरू शकतो याचे शीत गुण उन्हाळ्यात शरीराला शीत ठेवतात हे डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स ,फॉलिक ऍसिड अशा प्रकारची अनेक micronutrients असतात हे आपल्या शरीरासाठी हेल्दी असतात. बाहेरून कोकम सरबत आणून वापरण्यापेक्षा आपण घरीच कोकमची फ्रुट्स आणून त्यापासून सर्व तयार करू शकतो .कारण बाहेरच्या ज्यूसेस मध्ये अति प्रमाणात साखर व फ्लेवर्स असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

६) गुलकंद :- गुलकंद एक सुपरफुड म्हणून आपण खाऊ शकतो याचे अनेक फायदे आहेत हे शीत गुणात्मक असून पोटातील जळजळ कमी करते ऍसिडिटीचा त्रास कमी करते उन्हाळ्यात काही लोकांना नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असतो तो गुलकंद खाल्ल्याने नाहीसा होतो सकाळी उठल्यावर उपाशीपोटी आपण एक चमचा गुलकंद नियमितपणे खाऊ शकतो.

७) धने (कोरियांडर सीड्स):– धन्याच्या बिया या शीत गुणांच्या असतात व पोटाच्या तसेच यूरिन इन्फेक्शन वरही त्या काम करत असतात म्हणजे रात्री धणे पाण्यात भिजत घालून सकाळी ते धन्याचे पाणी त्यात थोड्या प्रमाणात मोठी खळी साखर घालून पिल्याने युरीन इन्फेक्शन कमी होतात व शरीराला थंडावा मिळतो उन्हाळ्याच्या दिवसात धन्याचे पाणी पिल्याने शरीरामध्ये शीतता जाणवते व उष्णतेचा त्रास कमी होतो.

८) इलायची :- इलायची गुणांनी शीत असते इलायची आपण चहा कॉफी यामधून घेऊ शकतो .किंवा इलायची स्वतंत्र ही खाऊ शकतो. इलायची इन्फेक्शन्स दूर करते व बऱ्याच पोटाच्या विकारातही इलायचीचा वापर किंवा त्या प्रमाणात केला जातो. इलायची ही मेटाबोलिझम बूस्ट करते म्हणजेच आपल्या चयापचयाच्या क्रियेत सुधारणा आणते तसेच वजन कमी करण्यासाठी इलायचीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात आपण इलायचीचे सेवन हे दुधामध्ये करू शकतो.

MUST TRY FOOD FOR THIS SUMMER

९) वाळा :- वाळा पण माठात किंवा पिण्याच्या पाण्यात टाकत असतो ते सुगंधी पाणी पिल्याने तहान भाग ते तसेच त्याचे औषधी गुणधर्म आहे ते शरीराला निरोगी ठेवतात तसेच वाळा पित्तनाचे कार्य करतो व शीत गुणात्मक असतो त्यामुळे ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो त्यांनी वाळ्याच्या पाण्याची नियमित सेवन करावी.

१०) बडीशेप:- बडीशेप आपल्या घरी सहज उपलब्ध असते जेवण झाल्यावर आपण नेहमी खात असतो ही अन्नपचनासाठी मदत करत असते. ती आपण पाण्यात किंवा चहात ही घेऊ शकतो तिला आरोग्यवर्धक मानतात ही शीत गुणात्मक असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करते तसेच उन्हाच्या त्रासापासून आपले सुटका करू शकते त्यामुळे बडीशेप चा आपल्या आहारात नियमित वापर करावा.

अशाप्रकारे या उन्हाळ्यात अशा घरगुती उपायांद्वारे आपण उन्हाच्या त्रासापासून आपल्या शरीराला वाचू शकतो यासाठी आपल्याला आहारासंबंधी काही गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागेल यामुळे आपण उन्हापासून तर वाचू शकतो याबरोबरच आपल्या शरीरातून जाणारे पाणी नियंत्रित ठेवून आपल्या त्वचेलाही या उन्हाळ्यात वाचू शकतो व त्वचेला नवीन तेज देऊ शकतो.

अशाच प्रकारच्या टीप साठी व आयुर्वेदिक टीप साठी आपले वेबसाईटला विजिट करा आणि अजून खूप गोष्टींचा आढावा घ्या धन्यवाद.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *