उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?

उन्हाळा सुरू झाल्यावर हेल्थ सोबतच स्किन प्रॉब्लेम पण डोकं वर काढत असतात . तेव्हा आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेण्याची ही यावेळी खूप गरज असते.कारण उन्हाळ्यात त्वचा काळवंडने, त्वचेवर काळे डाग येणे, त्वचेवर चट्टे पडणे, त्वचा तेलकट किंवा जास्त कोरडी होणे, त्वचेवर पुरळ येणे, त्वचेवर घामोळ्या येणे अशा अनेक सौंदर्य समस्या निर्माण होत असतात यासाठी उन्हाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

१)एक प्रखर उन्हात घराबाहेर पडू नका उन्हाळ्यात सूर्यकिरणे प्रकार असतात अशामुळे अशा सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग, लाल चट्टे पडू शकतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो शिवाय उन्हामुळे त्वचा लवकर डिहायड्रेट होते. त्यामुळे गरज नसताना घराबाहेर पडू नये.

२) घराबाहेर पडताना चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळावा किंवा कॅप किंवा हैट असं काहीतरी वापराव प्रखर उन्हातील सूर्यकिरणांचा त्वचेवर लगेच परिणाम होतो ,त्यामुळे सनबर्न टाळण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर कॉटनचा स्काप गुंडाळू शकता. शक्यतो हे स्कार्फ पांढऱ्या रंगाची किंवा लाईट असावे डार्क रंगाचे नसावेत कारण काळा रंग हा खूप जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश शोषून घेतो .

३)तसेच घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावावी खरंतर कोणत्याही ऋतूत घराबाहेर पडताना सनस्क्रीन नक्की लावावी कारण सनस्क्रीन मुळे थेट सूर्यकिरणांचा त्वचेशी संपर्क टाळता येतो मात्र सनस्क्रीन निवडताना चांगल्या कंपनीची आणि त्याचा एसपीएफ ३० असलेली सन स्क्रीन लावावी घराबाहेर जाण्यापूर्वी दहा पंधरा मिनिटे अगोदरच सनस्क्रीन लावावी मगच उन्हात घरातच्या बाहेर पढावे.

४)हेवी मेक अप टाळावा कारण उन्हाळ्यात जास्त घाम येतो व घामामुळे त्वचेच्या वर असलेल्या छोट्या छिद्रात मेकअप जाऊन बसतो त्यामुळे समस्या होतात काही जण चेहऱ्यावर भरपूर सारा मेकअप करतात व घामामुळे तो मेकअप पुसला जातो व चेहऱ्याच्या छिद्रामध्ये जाऊन बसतो त्यामुळे त्वचेवर पुरळ येणे ,पीपल्स येणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

५)भरपूर पाणी पिणे शरीर हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची गरज असते उन्हाळ्यात शरीराचे तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी भरपूर घाम बाहेर येत असतो, त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अनियंत्रित होत असते ,उन्हाळ्यात पुरेसं पाणी न पिल्याने त्वचा लवकर डिहायड्रेट होते तसेच कोरड्या त्वचेमुळे अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज शरीराला असते त्यामुळे नियमित पाणी प्यावे तसेच डीहायड्रेशन मुळे उष्माघाताचा त्रास देखील होऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्याचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत पाणी प्यावे लागते .

५) दररोज नारळ पाणी लिंबू पाणी कोकम सरबत किंवा इतर फ्रुट ज्यूस डायट मध्ये ऍड करावे त्यामुळे स्किन हायड्रेस राहण्यास मदत होते. एकंदरीत उन्हाळ्याच्या दिवसात आहारात लिक्विड डायटच प्रमाण जास्त करावं जेणेकरून त्वचा हायड्रेट राहते व त्वचेच्या समस्यांपासून दूर राहता येतो.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायांद्वारेही आपण त्वचेची व्यवस्थितरित्या काळजी घेऊ शकतो. त्वचेची काळजीसाठी महागडी कॉस्मेटिक प्रोडक्ट लागतात किंवा ब्युटी पार्लर जावे लागते हा समज चुकीचा आहे,कारण घरातच केल्या जाणाऱ्या काही उपायांद्वारे आपण उन्हाळ्यात त्वचेची चांगली काळजी घेऊ शकतो व अतिशय योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो .आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया ज्यामुळे उन्हाळ्यातही आपली त्वचा ताजी तवानी दिसेल.

७) डिटॉक्सिफाइंग वॉटर – शरीरामध्ये अंतर्गत स्वच्छता ही शरीरासाठी व आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते विशेषता उन्हाळ्यात डिटॉक्सिफाइंग वॉटर चा वापर करून शरीरातील अनावश्यक द्रव्य दूषित द्रव्य शरीराच्या बाहेर टाकली जाऊ शकतात. डिटॉक्सिफाइंग वॉटर आपण घरच्या घरी ही बनवू शकतो. यासाठी एका काकडीचे चार भागात तुकडे करावी ,त्यामध्ये पुदिना, लिंबू व थोडी कोथिंबीरची पाने टाकावी यामध्ये टरबुजाचे तुकडे किंवा संत्री चे तुकडे देखील टाकू शकतो. हे पाणी असलेले भांडे आपण थंड ठिकाणी ठेवून साध्या पाण्याच्या ऐवजी या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू शकतो व उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीराची त्वचा ही डिहायड्रेट होण्यापासून वाचते व तसेच डिटॉक्सिफाइ ही होते ,त्यामुळे शरीरातील विविध द्रव्य बाहेर फेकली जातात.

८) मुलतानी माती- उन्हाळ्यातील उष्ण तापमान व धुळ यापासून संरक्षणासाठी मुलतानी माती हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे .मुलतानी मातीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम क्लोराइड मुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि मुलतानी माती आपल्या त्वरित त्वचेच्या आतील थरांमधून तेल घाण आणि घाम बाहेर टाकते , मुलतानी माती ही अतिरिक्त घामापासून बचाव करण्यासाठी ही उपयोगी ठरते. तेलकट त्वचेवर मुलतानी माती लावण्यासाठी त्याचा विशेष प्रकारे प्रयोग केला जातो सुरुवातीला मुलतानी मातीला कोमट पाण्यामध्ये किंवा गुलाब जलामध्ये मिक्स करून तिचा व्यवस्थित लेप करून घ्यावा व नंतर तो लेप दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावावा नंतर कोमट पाणी करून काढून घ्या.- कोरड्या त्वचेला अतिशुष्क होण्यापासून वाचवण्यासाठी मुलतानी माती हि मध किंवा दह्यामध्ये मिसळून याचा व्यवस्थित लेप तयार करून घ्यावा व हा लेप चेहऱ्यावर सुखेपर्यंत ठेवावा नंतर थंड पाण्याचा वापर करून तो लेप देऊन काढावा यामुळे चेहरा शुष्क होण्यापासूनचे वाचतो.

९) आपल्या घरातील दररोजच्या वापरातील काही भाज्यांचा वापर करून देखील संरक्षण करू शकतो.काकड़ी – काकडी ही अशी भाजी आहे जिला खाल्ल्यामुळे जेवढे फायदे होतात तेवढेच तिच्या बाह्य वापराने सुद्धा होतात काकडी मुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा मदत होते काकडी मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीर हायड्रेट राहते यामध्ये काकडीचा रस वापरून त्वचेला ओलावा सुद्धा दिला जाऊ शकतो काकडी चा वापर करताना काकडीचा रस काढून तो चेहऱ्यावर लावावा व सुकेपर्यंत तसाच राहू द्यावा काकडीचा रस सुकल्यानंतर कोरड्या फडक्याने तो पुसून घ्यावा यामुळे चेहरा व त्वचा शुष्क होण्यापासून बचावतो.

१०) कोरफड- कोरफडीचे त्वचेसाठी व केसांसाठी चे फायदे खूप पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे वापरासाठी कोरफड हे आपल्याला सहज उपलब्ध होते व कोणत्याही वातावरणामध्ये ही उगवून येऊ शकते कोरड्या म्हणजे शुष्क व तेलकट त्वचेसाठी कोरफड जेल हे अतिशय उपयुक्त आहे. कोरड्या त्वचेवर कोरफडीचा वापर करताना त्यामध्ये खोबरेल तेल टाकले तर ते अधिक उपयुक्त ठरते कोरफड जेल ने मालिश केल्यावर चेहऱ्यावरती कांती निर्माण होते व तेज निर्माण होते.

अशाप्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेऊ शकतो यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या महागड्या कॉस्मेटिक प्रोडक्टची किंवा कोणत्याही ब्युटी सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही .आपण थोड्या प्रमाणात स्वतःची जर घरगुती गोष्टींचा आधार घेऊन काळजी केली तर आपली त्वचा निरोगी व सुंदर राहू शकते याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करण्यापूर्वी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल्स आहेत व ते त्वचेसाठी किती घातक आहेत यांचा परिपूर्ण अभ्यास करावा व त्यानंतरच वापरावे कारण प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते काहींना काही प्रॉडक्टची व त्यातील घटकांमुळे एलर्जी निर्माण होऊ शकते त्यासाठी जेवढे होईल तेवढे नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे सुरू करावं व या केमिकल युक्त कॉस्मेटिक प्रॉडक्ट चा वापर टाळावा जेणेकरून आपल्या त्वचेची हानी होण्यापासून वाचेल .

असेच विविध प्रकारच्या आरोग्यदायी टीप साठी आपण आपल्या वेबसाईटला विजिट करू शकता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *