उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्याल ?

प्रत्येकाला आपली त्वचा ग्लोइंग असावी असे वाटत असते. प्रत्येक ऋतूत त्वचा ताजी तवानी असावी यासाठी लोक त्वचेवर अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात. उन्हाळ्यात तर त्वचा तेलकट होणे ,रुक्ष होणे ,काळपट पडणे अशा अनेक समस्या निर्माण होत असतात .तर उन्हाळ्यात त्वचा ग्लोइंग ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही आज तुम्हाला देणार आहोत .यामुळे तुमचा खर्चही आणि वेळही वाचणार आहे व तुम्हाला योग्य तो सल्लाही मिळणार आहे.

SKINCARE FOR OILYSKIN

उन्हाळ्यात त्वचेची चमक हरवते फक्त त्वचा कांतीच नाही तर तीव्र उन्हामुळे त्वचेवर काळे डागही येतात .स्किन बर्न होते. तेव्हा फक्त ब्युटी प्रॉडक्ट वापरणे किंवा महिन्यातून एकदा दोनदा फेशियल करणे पुरेस होत नाही . हे करूनही पुन्हा एक दोन दिवसात त्वचा तशीच तेलकट दिसायला लागते व काळे डाग निर्माण व्हायला लागतात व आपण इरिटेट होऊन जातो त्यामुळे आपल्या त्वचेची व चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण काही टिप्सचा वापर केला पाहिजे यासाठी आज मी तुम्हाला पाच अशा टिप्स देणार आहे जेणेकरून तुमच्या शरीरावरील तेलकट त्वचा व या त्वचेची तुम्ही योग्य अशा पद्धतीने काळजी घेऊ शकाल व या कडाडत्या उन्हामध्ये तुमच्या त्वचेची काळजी घेऊन तुम्ही त्वचेला कांतीमय बनवू शकाल.तर नक्की फॉलो करा या टिप्स:-

1) कमी मेकअप व सनस्क्रीनचा वापर :- यातील पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला सवय असते की खूप सारे प्रमाणामध्ये मेकअप करणं पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडल्याबरोबर आपण घमाघुम होऊन जातो त्यामुळे जास्त मेकअप काही कामाचा नाही. चेहऱ्यावर आपण मेकअपचे लेयर केल्यामुळे तो मेकअप घामामुळे उतरतो आपल्या शरीरात वरील त्वचेवरील छिद्रा मध्ये जाऊन बसतो व त्यामुळे शरीरात त्यामुळे शरीरातील जल बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडणं, त्वचा काळी होणं तसेच डीहायड्रेशन होणं अशा गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते त्यामुळे उन्हाळ्यात मेकअप करू नये किंवा अतिशय कमी प्रमाणात करावा. त्याबरोबरच सनस्क्रीन चा वापर करावा घरातून बाहेर पडण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे अगोदर आपण चांगल्या प्रतीची सन स्क्रीन शरीराला लावावी सनस्क्रीन चा वापर ऊन जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात करावा यामुळे आपली त्वचा निरोगी राहते व त्वचेवर कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन्स किंवा डाग पडत नाहीत.

2) फेस पैक:- जर तुम्ही ऑइल स्किन साठी वेगवेगळ्या प्रकारची फेस पॅक किंवा फेस वॉश घेऊन थकला असाल तरीही काही परिणाम होत नसेल तर ओईली स्किन साठी घरगुती उपाय आहे. हा उपाय वापरून तुम्ही ऑइल स्किन नियंत्रणामध्ये ठेवू शकता व तिची काळजी घेऊ शकता. यासाठी एक केळी व एक चमचा मध आपण एका वाटीमध्ये बारीक मिक्स करून घ्यावेत व त्याची पेस्ट बनवावी. त्यामध्ये एक लिंबू पिळून आपण चेहऱ्यावर वीस मिनिटापर्यंत याचा लेप करून लावू शकतो. यामुळे चेहरा एकदम निरोगी राहतो व त्वचेला कांती येते तसेच त्वचेवरील तेल नाहीसे होते व त्या तेलकट त्वचेची आपण याच्याद्वारे काळजी घेऊ शकतो हा लेप आपण दिवसातून दोन वेळा वापरू शकतो .20 मिनिटे झाल्यानंतर आपण थंड पाण्याने तो व्यवस्थित धुवून काढावा व आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळालेला असेल.

NATURAL SCRUB FOR OILYSKIN

3) एप्पल आणि फेस पॅक :– हा फेस पॅक ऑइल स्किन साठी एक उत्तम फेस पॅक म्हणून ओळखला जातो. मधामुळे त्वचेला सॉफ्ट टेक्चर तयार होऊन जातं तर एप्पल मुळे त्वचेला पोषण मिळते. यासाठी आपल्याला अर्ध सफरचंद व त्यामध्ये दोन चमचे मध घेऊन ते त्याची एकदम पातळ अशी पेस्ट बनवून त्याचा लेप चेहऱ्यावर करावा आठवड्यातून दोनदा अशाप्रकारे आपण हा एप्पल आणि फेस वॉश वापरू शकतो याचा लेप करून झाल्यानंतर वीस मिनिटापर्यंत हा चेहऱ्यावर ठेवावा सुकल्यानंतर त्याला थंड पाण्याचा वापर करून व्यवस्थित धुवुन काढावे यामुळे त्वचा ग्लोइंग होते व तेलकट त्वचेची काळजी घेतली जाते. तसेच ॲपलच्या प्रॉपर्टीजमुळे आपल्या चेहऱ्याला योग्य ते पोषणही मिळते.ओईली स्किन असेल तर आपल्याला त्यातून आराम मिळू शकतो.

4) सतत चेहरा धुने:– आपल्याला सवय असते की तेलकट त्वचा आहे म्हणून आपण तिला पुन्हा पुन्हा धूवत असतो परंतु हेच तर करू नका पुन्हा पुन्हा चेहरा धुऊ नका,तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन वेळा त्वचा धुवू शकता परंतु त्वचा धुतल्याने त्वचा रूक्ष होते व नंतर आपला ग्लैंड्स आणखी तेल सीक्रेट करायला लागतात व त्यामुळे तेल सीक्रीशन जास्त वाढल्याने नंतर पिंपल्स , डाग आपल्या त्वचेवर येऊ शकतात त्यामुळे सतत आपला चेहरा धुवत बसू नये दोन-तीन वेळा दिवसातून चेहरा धुतल्या ने तेलाच्या समस्ये पासून सुटका मिळू शकते.

5) कोमट पाणी ने चेहरा धुने – चेहरा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी चांगले समजले जाते कारण कोमट पाण्यामुळे चेहऱ्यावरील धूळ घान निघून जाते तुम्ही जर दिवसातून दोन वेळा चेहरा साफ करत असाल तर कोमट पाण्याने एकदा चेहरा साफ केला तरीही तुम्हाला त्याच पटीत रिजल्ट मिळेल उन्हातून आल्यावरही तुम्ही कोमट पाणी बनवून थोड्याशा प्रमाणात त्वचा साफ केली तर ते फायद्याचे ठरू शकते.

6) गुलाब जल :- गुलाब जल रोज रात्री झोपताना चेहरा साफ केल्यानंतर त्यावर गुलाब जल लावल्याने चेहरा मऊ होतो व ऑईली स्किन पासून सुटका मिळू शकते गुलाबजालातील मेडिसिन प्रॉपर्टीज मुळे आपला चेहऱ्याला एक ग्लो तयार होतो ,चेहरा पाण्याने साफ केल्यानंतर त्यावर गुलाब जल लावून झोपून जावे. त्यावर नंतर कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा लोशन लावण्याची तुम्हाला गरज भासणार नाही त्यामुळे उन्हामध्ये तुमची स्किन मेंटेन राहू शकते, त्वचेवर कांती येऊ शकते.

उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी अशी घ्यावी

हे आहेत सोपे व घरगुती करता येण्यासारखे उपाय ,दुकानामधून किंवा मेडिकल मधून अनेक केमिकल युक्त कॉस्मेटिक पदार्थ घेऊन आपण चेहऱ्यावर लावतो व त्याचे आपल्या चेहऱ्यावर फायदे तर सोड आज पण खूप सारे तोटे होत असतात ,काही वेळा चेहऱ्यावरील इन्फेक्शन्स होता ,तर काही वेळा काळे डाग पडतात व ज्या समस्येसाठी आपण हे प्रॉडक्ट वापरत होतो ती समस्या तर सोडाच पन इतर समस्या उद्भावु शकतात.त्यासाठीच अशा हार्मफुल केमिकल युक्त पदार्थांपासून आपला चेहरा साफ करण्यापेक्षा अशा घरगुती उपायांनी आपण आपला चेहरा साफ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते नक्कीच फायद्याचे ठरेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *