उन्हाळ्यातही ग्लोइंग त्वचेसाठी उपाय – facepack

प्रत्येकाला आपली स्किन ग्लोइंग असावी असे वाटते. प्रत्येक ऋतूत त्वचा ताजी तावानी दिसावी यासाठी लोक त्वचेवर अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात .उन्हाळ्यात तर त्वचा तेलकट होणे, वृक्ष होणे, काळपट पडणे अशा अनेक समस्या निर्माण होत असतात. तर उन्हाळ्यात त्वचा ग्लोविंग ठेवण्यासाठी काही टिप्स,

NATURAL MASKS FOR BEAUTIFUL SKIN

यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही व तुमचा वेळही वाचेल व या घरगुती टिप्स असल्यामुळे याचे काही विपरीत परिणाम पन होणार नाहीत. उन्हाळ्यात त्वचेची चमक हरवते, त्वचा कांतीहीन होते तर तीव्र उन्हामुळे त्वचेवर काळे डाग येतात , स्किन बर्न होते तेव्हा फक्त ब्युटी प्रॉडक्ट वापरणे किंवा महिन्यातून एकदा दोनदा फेशियल करणे एवढेच पुरेसं नसतं यासाठी घरच्या घरी अतिशय उपयुक्त असं फेशियल तुम्ही तयार करू शकता उन्हाळ्यात त्वचा जास्त खराब होते चेहऱ्यावर डेड स्किन जमा होत असते तो डेड स्कीनचा थर काढण्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता व्हावी लागते व त्वचेची पोषण होणे या दोन्ही गोष्टी खूप जास्त आवश्यक असतात .यासाठी घरगुती तीन स्टेप फेशियल महत्त्वाचा ठरतो चला तर पाहूया मग कसा बनवायचा हा तीन स्टेप फेस पॅक घरच्या घरी अतिशय कमी खर्चात व अतिशय जास्त इफेक्टिव्ह.-

१) कच्च दूध – सर्वात पहिली स्टेप आहे कच्च्या दुधाने क्लिनजिंग करण, त्वचा क्लीन करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही ब्युटी प्रॉडक्टची गरज नाहीये ,कच्च दूध आधी फ्रीजमध्ये ठेवून थोडे थंड करा व मग थंड दूध चेहऱ्यावर मसाज करत त्वचा स्वच्छ करावी कच्च्या दुधाणे चेहरा साफ केल्याने चेहऱ्यावरची डेड स्कीन लवकर निघून जाण्यास मदत होते. कच्च्या दुधात असलेल्या लॅक्टिक ऍसिडमुळे त्वचा ताजी तावानी दिसते व त्वचेवर एक प्रकारचे तेज निर्माण होते ,दुधात प्रथिन्यांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे त्वचेला आद्रता मिळत राहते तसेच कच्च्या दुधाच्या वापराने त्वचेतील कॉलेजन ची निर्मिती होत असते त्यामुळे त्वचा घट्ट होऊन सैल पडत नाही , उन्हाने काळी पडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी दुधाचा वापर केल्याने काळपट पना लवकर निघून जातो.

२) मसूर डाळीचा फेस स्क्रब- कच्चा दूध आणि त्वचा स्वच्छ केल्यानंतर मसूर डाळ स्क्रब तुम्हाला करायचा आहे यासाठी एक चमचा मसूर डाळ व दोन चमचे कच्च दूध एवढेच लागतं, मसूर डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यावी व नंतर त्या डाळीत कच्च दूध टाका हे मिश्रण जास्त घट्ट होऊ देऊ नका नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे व हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करावा हा मसाज दोन-तीन मिनिटे तरी करावा हा माझा व्यवस्थित केल्यानंतर ५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या त्यामुळे तुमच्या स्क्रीनवरील डेड स्किन निघून जाते आणि ब्लड सर्क्युलेशन ही व्यवस्थित राहण्यास मदत होते. मसूर डाळीच्या पीठाने स्क्रब केल्याने डेड स्कीन निघून जाते व त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते चेहऱ्यावरील मुरूम, डाग ,पुटकुळ्या ही समस्या देखील लवकर बरी होण्यास मदत होते त्यामुळे मसूर डाळीतला आपण नॅचरल स्क्रबर देखील म्हणू शकतो.

३) मुलतानी मातीचा लेप- लाल मसूर डाळीने स्क्रब केल्यानंतर शेवटी मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर करावा. यासाठी एक चमचा मुलतानी माती आणि दोन चमचे कोरफड जेल एवढेच पाहिजे एका वाटीत दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या व याचा व्यवस्थित लेप चेहऱ्यावर लावावा दहा ते दहा ते पंधरा मिनिटानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा नंतर चेहऱ्यावर मोईश्चरायजर अप्लाय करा. मुलतानी मातीचा लेप लवकर चुकतो व तो पूर्ण कोरडा होऊ देऊ नये मुलतानी मातीच्या लेपामुळे त्वचेला आवश्यक खनिजे सुद्धा मिळतात त्वचा खोलवर स्वच्छ होते तसेच त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. त्वचेवरचा अतिरिक्त तेल सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं त्याचबरोबर चेहऱ्यावरचे मुरूम डाग पुटकुळ्या पिंपल्स डार्क सर्कल हे सगळं कमी होण्यासाठी मदत होते.

उन्हाळ्यातही ग्लोइंग त्वचेसाठी उपाय

उन्हामुळे तुमची त्वचा खराब होत असेल किंवा तुम्हाला कामानिमित्त उन्हात बाहेर पडावे लागत असेल तर हा फेशियल पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की केला पाहिजे यामुळे तुमची त्वचा व्यवस्थित राहण्यास मदत होईल. त्याबरोबरच मार्केटमधून घेतलेल्या कोणत्याही केमिकल युक्त कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करण्यापूर्वी अशा प्रकारच्या घरगुती टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा व्यवस्थित ठेवू शकता. जेणेकरून तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही व तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट ही मिळेल याचबरोबर तुमचा पैसा आणि वेळही वाया जाणार नाही.

टीप- साधारणपणे अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून त्वचा स्वच्छ केली तर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्वचेवर होत नाहीत परंतु जर कोणाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची एलर्जी असेल तर त्यांनी कृपया डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशा प्रकारच्या गोष्टी कराव्यात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *