आयुष मंत्रालय

आयुष विभागाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात अनेक विभागांमध्ये विविध प्रकारे कामे केली जातात,
तर आयुष म्हणजे नक्की आहे काय?
आयुष विभागाची स्थापना भारत सरकार द्वारे केली गेली आहे. 9 नोव्हेंबर 2014 रोजी भारत सरकारने या विभागाची स्थापना केली. आयुष आयुर्वेदाला प्रमोट करण्याचे आणि रिसर्च करण्याचे कार्य करतो. आयुष या शब्दाची निर्मिती
A – आयुर्वेदा
Y- योगा अँड नॅचरोपॅथी
U- यूनानी चिकित्सा आणि
S- सिद्धा
H- होमिओपॅथी
या सर्वांना प्रमोट करण्याचे मुख्य काम आयुष डिपार्टमेंट च्या माध्यमातून केले जाते.
भारताला आयुष विभाग स्थापन करण्याची गरज का वाटली ?
भारत हा आयुर्वेदाचा जन्मदाता आहे पण फक्त 25% हरबल व आयुर्वेदिक प्रोडक्ट्स भारत सप्लाय करतो. भारतापेक्षा इतर देशांमध्ये आयुर्वेदाला जास्त प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये याचा वापरही खूप कमी प्रमाणामध्ये होतो. यावर संशोधनही खूप कमी प्रमाणात झालेले आहे. तर चायना सारखा देश आज 20 टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट सप्लाय करतो .अशीच वेळ राहिली तर काही वर्षात आपल्याला मेड इन चायना च्या आयुर्वेदिक औषधं घ्यावी लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी भारत सरकारला आयुष स्थापन करण्याची गरज भासली .अगोदर आयुष विभाग हा हेल्थ डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करायचा परंतु हा आता एक स्वतंत्र विभाग आहे .
आयुष विभागाच्या अंतर्गत अजूनही काही विभाग काम करतात त्यामध्ये CCRAS – सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स
CCRSM – सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्ध मेडिसिन
CCRUM – सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन
CCRHM – सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथिक मेडिसिन
या विविध विभागांच्या अंतर्गत त्याच्या पैथीज द्वारे केल्या जाणाऱ्या चिकित्सेला प्रमोट करण्याचे काम वरील डिपार्टमेंटस करतात व त्यांचा प्रसार केला जातो. यात आयुर्वेदासारख्या मुख्य चिकित्सा प्रणालीवर भर आहे ,त्यामुळेच आज आयुर्वेद या स्तरावर पोहोचले आहे की ते सर्वसामान्यांपर्यंत गेलेले आहे व त्याचा उपयोग लोकांना समजू लागला आहे. योगा व आयुर्वेदाबद्दल लोकांमध्ये जनजागृती झाली आहे.
आपल्या या पुरातन शास्त्राला पुन्हा जीवंत करण्याचे श्रेय या विभागाला नक्कीच जाते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *