आयुर्वेद म्हणजे नेमकं काय?

आज आयुर्वेद शब्द समोर आला की आपल्या मनात अनेक विचार येतात. जडीबुटी झाडपाल्याचे औषध म्हणजे आयुर्वेद का ?
कडू औषधे, चूर्ण , काढ़े म्हणजे आयुर्वेद का ?
आयुर्वेदाच्या औषधांनी बरे होण्यास उशीर लागतो ?
तेल लावून मसाज केली जाते म्हणजे आयुर्वेद का ?
पंचकर्म म्हणजेच आयुर्वेद का ?
सर्वसामान्य लोकांना हेच प्रश्न पडलेले असतात .त्यांना आयुर्वेद नक्की काय आहे हे माहिती नसतं .त्यामुळे त्याची चिकित्सा कशी घ्यावी हेही त्यांना समजत नाही. म्हणून शरीराला दुष्परिणाम कारक असली तरीही ऍलोपॅथीची ट्रीटमेंट ते घेतात. चला तर पाहूया आयुर्वेद नक्की काय आहे.
आयुर्वेदिक ही भारतीय उपखंडातील प्राचीन अशी निदान व औषधी चिकित्सा आहे .आयुर्वेद व योगशास्त्र हे भारताकडून जगाला एका अर्थाने देणगीच आहे. प्राचीन काळात उपलब्ध असलेली वनस्पती ,प्राणी पदार्थ ,खनिजे वापरून ही चिकित्साप्रणाली रूढ झाली. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी आयुर्वेदाची उत्पत्ती झाली असे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे .आज योग व आयुर्वेदाकडे पाश्चात्य देशांचा कल वाढताना दिसतो आहे हजारो वर्षापासून अनुभव सिद्ध चिकित्सा प्रणाली मनुष्याच्या विविध आजारांवर यशस्वी ठरलेले आहे.


आयुर्वेदाचा मुख्य हेतू – आयुष्य वेद: आयुर्वेद:|
हा आहे म्हणजेच जीवन व आयुष्य यांच्या बद्दल जाणून घेणे हेच आयुर्वेद आहे. यामध्ये आयुष्य म्हणजे काय , आयुष्य कसे जगावे , आपले आयुष्य किती , आयुष्यात हितकारक अहीतकारक गोष्टी कोणत्या हे ज्या शास्त्रात आहे त्याला आयुर्वेद असे म्हणतात.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या कालावधी त्यास आयू म्हणतात.
ज्या शास्त्रामध्ये आपण आपल्या शरीर मन व स्वतःसाठी ज्या काही गोष्टी करतो त्यांच्याबद्दल जाणून घेतो म्हणजे आयुर्वेद शास्त्र होय. आयुर्वेद आयु बद्दल संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने देतो. त्यानुसार जीवन जगाल तर तुम्ही निरोगी राहता अन्यथा रोगी बनता त्यामुळेच आयुर्वेदाला “जीवनाचे शास्त्र” म्हणजेच “सायन्स ऑफ लाईफ” असे म्हणतात. जीवनाचे विभिन्न काळ जसे की बाल्यावस्था, तरुण अवस्था ,वृद्धावस्था ,सकाळ ,दुपार ,संध्याकाळ ,रात्र यामुळे होणारे शरीरातील बदल तसेच ऋतूनुसार होणारे , खाण्यापिण्यामुळे होणारे , क्रोध इर्षा यामुळे होणारे, आचार व विचार यामुळे होणारे शरीरातील बदल याचे विस्तार पूर्वक वर्णन आयुर्वेद शास्त्रात केलेले आहे.


आपण जर शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा देणाऱ्या वैद्याकडे गेलो तर सुरुवातीला ते आपल्या आजाराबद्दल माहिती विचारतील ,त्यानंतर आपल्या जीवनाबाबत सुद्धा प्रश्न विचारतील अशा अनेक प्रश्नांवरून आजाराचे ठिकाण प्रत्यक्ष बघून किंवा स्पर्श करून व्याधी जाणून घेतला जातो व आपल्या प्रकृतीनुसार औषध व पथ्य सांगून उपचार केले जातात .
आज पूर्ण विश्वात रोग होऊ नये म्हणून काय करावे या विषयावर चर्चा सुरू आहे याला आधुनिक परिभाषेत “प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन” असे म्हणतात. “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर “आज हा सिद्धांत जगभरात मान्यता पावलेला आहे .आयुर्वेदात पाच हजार वर्षांपूर्वी “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं | “, सांगितले आहे इतर वैद्यकीय शास्त्रांपेक्षा आयुर्वेदाचा भर रोगांवर उपचारापेक्षा निरोगी जीवनावर अधिक आहे .”स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं। ” म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे रक्षण करणे व रोगी व्यक्तीचे विकार बरे करणे म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ टिकवण्यासाठी पूर्ण काळजी घेतल्यास तो व्याधीग्रस्त होऊच शकत नाही या वर आयुर्वेदाचा कटाक्ष आहे .आज या नियमांचे पालन केले तर आजारांपासून संरक्षण कठीण नाही आणि जर रोग झालास तर संपूर्ण चिकित्सा सुद्धा उपलब्ध आहेतच की अशाप्रकारे प्रिवेंशन व क्युअर चे वर्णन आयुर्वेदात आहे .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *